कोकण सर्च विषयी

शोध हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे . प्रत्येक माणूस आयुष्यभर काहीना काहीतरी शोधतच असतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या शोध, कधी एखादया वस्तुचा, कधी नवीन स्थळांचा तर कधी अन्य गरजेच्या गोष्टींचा. शोध हा चालूच असतो . या मध्ये सर्वात निकडीचा आणि महत्वाचा शोध असतो तो म्हणजे निसर्गाचा.

याच निसर्गाच्या शोधासाठी "कोकण सर्च" ह्या पहिल्या वहिल्या सर्च इंजिनने शोध घेतला आहे तो कोणासाठी कधीही असणा-या निसर्गरम्य कोकणचा ……

कोकण , कोकण म्हणजेच ऎतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वारसा लाभलेलं महाराष्ट्राचं सौंदर्य...

चहुबाजुंनी विस्तीर्ण समुद्रकिनारा, सागरी लाटा, हिरवीगार वनराई , ताडामाडांच्या रांगा , आंबे, फणस , काजु , कोकम, सुपारी , पपई , भोपळा , या आणि अशा अनेक फळभाज्या , फळ , पालेभाज्या म्हणजेच कोकणातल्या मातीतलं सोनं... कोकणातल्या समुद्रात सापडणारे सुरमई , बांगडा , बोंबील , पापलेट , कोळंबी हे सारे मासे आणि त्याला कोकणातील सुगरणींच्या हाताची लाभलेली लज्जतदार चव म्हणजेच मत्स्य शौकीनांच्या तोंडाला पाणीच आणणारं... ऎतिहासिक किल्ले , प्राचीन मंदिरे , जलदुर्ग , समुद्रातील तटबंदी , वळणदार घाट , उंच उंच डोंगर हे सांर पर्यटकांचे डोळे दीपावून टाकतात... आणि ह्या प्रवासात भेटणारी कोकणी माणसं पर्यटकांना आपलंसं करून टाकतात . कोकणातल्या निसर्गासारखाचं इथल्या माणसाला माणुसकीच वरदान लाभलेलं आहे. हा कोकणी माणुस निसर्गावर प्रेम करणारा आणी निसर्ग जतन करणारा आहे, त्याने शेती व्यवसाय , मत्स्यव्यवसाय , लघुद्योग , पर्यटन अशा ब-याच क्षेत्रात पाउलं टाकून आपली मेख रोवली आहे .पण तरीही काही विविध उलथांपालथीमुळे तो म्हणावी तशी प्रगती करू शकला नाही...

म्हणुनच आजच्या काळाची गरज लक्षात घेता टेक्नोलोजी आणि इंटरनेट ह्या माध्यमातून कोकणची संस्कृती , पर्यटन स्थळे , कोकणातील लहान मोठे व्यवसाय व उद्योगधंदे ,कोकणी मेवा व उत्पादने या सा-यांना जागतिक बाजार पेठ मिळावी आणि कोकणचा आर्थिक विकास व्हावा ह्या हेतूने " कोकण सर्च " ह्या कोणासाठी कधीपण असलेल्या पहिल्या सर्च इंजिनाचा जन्म झाला आहे. कोकण सर्च द्वारे आता कोकणातील माहिती व वस्तु केवळ एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे... " कोकण सर्च " हे कोकणाच्या औद्योगिक प्रगतीकडे वळलेलं पहिलं पाऊल आहे.

कोणासाठी व कशासाठी

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणची संस्कृती जगासमोर येणे फार गरजेचं आहे. येथील गणेशोत्सव , शिमगा , दशावतरी , भजने , जत्रा अशा विविधतेने नटलेल्या कोकणाची ओळख सर्च इंजिन करून देत आहे. तसेच कोकणातील दररोजच्या घडामोडी आपणांस सहजतेने मिळणार आहेत.

तुम्हाला कधी कोकणात येऊन कोकणातील उकडीचे मोदक, नारळाच्या वडया , सोलकढी , मटण वडे , माशाचे कालवण , झुणका भाकरी असे अस्सल कोकणस्थ पदार्थ खावे असे वाटले अथवा कोकणात अचानक तुम्हाला स्थानिक पोलिस स्टेशन , इलेकट्रीशियन , प्लम्बर , हॉस्पिटल , मेडीकल , पेट्रोल पंप , हॉटेल्स , मेकेनिक ,टायर पंक्चरवाला या आणि अशा अत्यावश्यक व्यक्ती, वस्तू व सेवांची गरज भासली तर काळजी कशाला करता या सर्वांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक कोकण सर्चद्वारे सहज उपलब्ध होत आहे. मोबाईलचा वापर करा आणि न समजलेल्या अन न उमगलेल्या कोकणचा आस्वाद घ्या.

कोकण पर्यटन हे एक महत्वाचा रोजगार मिळवून देणारे क्षेत्र बनले आहे. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी काही गोष्टी नियोजनबद्ध करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने 'कोकण सर्च' कोकणातील व्यवसाय वाढीसाठी (Business Development) प्रयत्न करीत आहे .

'कोकण सर्च' द्वारे आज कोकणातील युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे आणि हेच आमच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे.