Contact Us :
रेवदंडा समुद्रकिनारा , अलिबाग | रेवदंडा बीच | Revdanda Beach Alibag
अलिबाग स्थानकापासून १७ किमी. अंतरावर असणारे हे ऐतिहासिक बंदर आहे. याच ठिकाणी रोहयाहून येणार्या कुंडलिका नदीचा अरबी समुद्राशी संगम होऊन खाडी तयार झाली आहे. रेवदंडा बंदराच्या पलिकडे साळाव गावापासून मुरूड तालुक्याची हद्द सुरू हते. या खाडीवर बांधलेला मुरूड आणि अलिबाग तालुके जोडणारा वाहतुकीच्या संदर्भात उपयुक्त ठरणारा साळाव खाडी पूल १९८६ पासून वाहतुकीस खुला झाला आहे. या पुलावरून मुद्दामहून फेरफटका मारा. सभोवतालच्या नैसर्गिक परिसराची अजब किमया तुम्हाला गुंग करील. साळावकडील टोकावरून संपूर्ण रेवदंडाचा परिसर सागराचे विलोभनीय दर्शन खाडीतील गलबतांची वहातुक तसेच डाव्या बाजूला दूरवर दिसणारे विक्रम इस्पात कंपनी तर उजव्या बाजूस या पुलाजवळच विक्रम इस्पात कंपनीची जेटी दिसत
.
रेवदंडा बंदराजवळच एस.टी. स्थानक तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचे स्थानक आहे. एस.टी. स्थानकाच्या मागील बाजूस खाडीत छोटासा धक्का पकटी आहे. या भागात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालतो. मासे पकडून आणलेली गलबते होडया या धक्क्याजवळच थांबतात. या ठिकाणी ताज्या मासळीची खरेदी-विक्री होते.
Other Details
मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ नाक्यापासून एक रस्ता आहे.
हवाई मार्गे:
सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे.
रेल्वेने :
सीएसटी मुंबईहून कोकण रेल्वे गाड्या अलिबागपासून २८ किमी अंतरावर पेण येथे थांबतात, तेथून तुम्ही बस, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी घेऊ शकता.
रस्त्याने :
अलिबाग मुंबईपासून १०८ किमी अंतरावर आहे, नवी मुंबई मार्गे ३ तासांचा प्रवास. तथापि तेथे पोहोचण्याचा जलद मार्ग म्हणजे गेटवे ऑफ इंडिया वरून फेरी पकडणे.