Contact Us :
आंजर्ले समुद्रकिनारा रत्नागिरी , दापोली
आंजर्ले गावाला विस्तृत किनारा लाभला आहे. सागर किनारी आणि खाडी काठची भरती-ओहोटीच्या वेळची जनक्रीडा पाहणे हा संस्मरणीय अनुभव आहे. सदाहरित वृक्षराजीची शाल पांघरून अत्यंत नीरव वातावरणात गाव पहुडलेले असते. पक्ष्यांच्या मंजूळ कूजनाने आला तर आल्हादकारक व्यत्यय येतो. मंदिराचे पांढरेशुभ्र कळस दूर अंतरावरूनच भक्तमंडळींना खुणावत असतात. गर्द झाडीत लपलेल्या मंदिराची मानवनिर्मित कलाकृती केवळ अनुपम आहे. पण या सगळया चराचराशी एकदा भावनिक तादात्म्य साधले की सकाळ संध्याकाळच्या रंगांनी रंगलेले मंदिर, चांदण्यांच्या धूसर प्रकाशात आणि पौर्णिमेच्या सुधारसांत स्नान करणारे मंदिर, पावसाळयातील सागराचे रक्तरंजित तांडव आणि त्याचवेळी धुवाधार पावसांत सचैल स्नान करणारे मंदिर, असे सौदर्
ाचे परोपरीचे आविष्कार केवळ रसिक मनालाच जाणवतात. दृक् प्रत्ययापलीकडील आनंदभूमींत जाण्याची किमया, हे तर देणे ईश्वराचे.
आंजर्ले हे गाव कड्यावरचा गणपती (एक उंच कडा यावर गणेश मंदिर) यासाठी प्रसिद्ध आहे आणि आंजर्ले समुद्रकिनारा हे इथले प्राथमिक आकर्षण आहे. त्याचे खोड योग्य दिशेने वळले आणि आंजर्ले येथील गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे.
राहण्यासाठी खोल्या :
हॉटेल्स आणि कॉटेजेस आंजर्ले आणि दापोली जवळ उपलब्ध आहेत.
Other Details
आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश “१७-४२ वर आणि पूर्व रेखांश ७३-८” वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. आंजर्ले खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होऊन १ जानेवारी २००६ पासून हा रेवस-आंजर्ले-दापोली-रेड्डी सागरी महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
विमान:
जवळील विमानतळ मुंबई
रेल्वे :
जवळील रेल्वे स्टेशन खेड
बस:
मुंबई ते आंजर्ले(२५० किमी) :
मुंबई -पनवेल –पेन – माणगाव – लोणेरे फाटा – गोरेगाव – आंबेत – शेणले – मंडणगड – दापोली -आंजर्ले .
पुणे ते आंजर्ले : ३ मार्ग आहेत
पुणे तो आंजर्ले ताम्हिणी घाट मार्गे (२२० किमी ) : पुणे – चांदनी चौक – पौड – मुळशी – डोंगरवाडी – ताम्हिणी घाट – विले –निजामपूर – माणगाव – लोणेरे फाटा – गोरेगाव – आंबेत –म्हाप्रळ – शेणले –मंडणगड –दापोली -आंजर्ले .
पुणे ते आंजर्ले महाबळेश्वर मार्गे (२५० किमी ) : पुणे –शिरुरू पांचगणी –महाबळेश्वर –पोलादपूर –भरणा नका –खेड –फुरूस –वाकवली –दापोली -आंजर्ले .
पुणे ते आंजर्ले भोर घाट मार्गे (२०० किमी ) : पुणे –खेड -शिवापूर –भोर –वर्धना घाट– लाटवण –दापोली -आंजर्ले .