Contact Us :
शिरोडा वेळागर समुद्रकिनारा , शिरोडा | Shiroda Velagar Beach - Shiroda, Vengurla
वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य शिरोडा हे गाव आहे. हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माड-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव! शिरोड्यापासून गोवा अवघ्या ७ कि.मी. अंतरावर आहे. शिरोड्याला लांबच लांब पसरलेली पांढर्या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी लाभलेली आहे. या चौपाटीलगतच असलेले भल्यामोठ्या सुरुच्या वृक्षांचे बन हे तर शिरोड्याचे एक खास वैभव आणि आगळे वैशिष्टयही आहे. साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले प्रतिभावंत साहित्यिक वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर ह्यांची ही प्रेरणाभूमी आणि कर्मभूमीही! भाऊसाहेब खांडेकरांनी येथील ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि प्रारंभीच्या उत्तमोत्तम कादंबर्
ाचे लेखनही. असे हे शिरोडा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी लाभलेले गाव आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्त्वही फार आहे. १९३० साली शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात शिरोडा गावाचे नाव अग्रक्रमाने नमूद झालेले आहे.