सुधागड किल्ला रायगड पाली - Sudhagad Killa, PALI

भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते. याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो

दरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली."

शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होी.

सुधागड अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड-पाली तालुका असे आहे.

जेवणाची सोय :

जेवणाची सोय स्वतः करावी. गडावर मोठी भांडी आहेत.

पाण्याची सोय :

वाड्या पासून ५ मिनिटावर ३ मोठी टाकी आहेत. पैकी सर्वात मोठ्या टाक्यात उतरण्यास सोय आहे. उन्हाळ्यात मधल्या टाक्यातले पाणी पिणे सोयीस्कर. पाच्छापूर दरवाज्याजवळ एक टाके आहे. तसेच धोंडसे मार्गावर २ कोरीव टाकी असल्यामुळे गडावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. तलावातील पाणी पिऊ नये.

क्रियाकलाप करू घेणे :

राहण्यासाठी खोल्या :
पंत सचिव वाड्यामध्ये आणि भोराई देवी मंदिर मध्ये अंदाजे ५ लोक राहू शकतात.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

पंत सचिवांचा वाडा , पश्चिमेकडील पठार , महादरवाजा , महादरवाजा परिसर , भोराई मंदिर , शिवमंदिर , टकमक टोक अथवा बोलते कडे