Contact Us :
मार्लेश्वर मंदिर - देवरुख , रत्नागिरी - Marleshwar Mandir - Devrukh,
महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. असे सांगण्यात येते की, हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. गुहेत साप, नाग ह्याचे वास्तव्य आहे. पण ते कुणालाही ईजा करत नाहीत.
जेव्हा हे स्थान निर्माण झाले तेव्हा येथे पार्वती नव्हती. आणि म्हणूनच ह्या देवस्थानाची अशी पद्धत आहे की येथे दर मकर संक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते. 'मार्लेश्वर' हा वर तर साखरपा ह्या गावाची
#39;गिरिजादेवी' ही वधू समजून लग्न लावले जाते. साखरप्यातून 'गिरिजाईदेवी' पालखीतून मारळ ह्या गावातून मार्लेश्वर ह्या ठिकाणी जाते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. ह्या शिव पिंडी स्वयंभू आहेत. मकर संक्रातीचा आधीचा दिवस आणि संक्रांत ह्या दोन दिवशी ह्या ठिकाणी यात्रा भरते.
ह्या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परीसारतील लोक चालत मारेश्वरच्या दर्शनासाठी जातात. मार्लेश्वरला गेल्यावर प्रथम धबधब्या खाली अंघोळ करून मग मार्लेश्वर चे दर्शन घ्यायचे अशी पद्धत आहे. गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. तीनही बाजूने उंच डोंगर आहेत. ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा 'धारेश्वर' ह्या नावाने ओळखला जातो.
असे म्हटले जाते कि ह्या धबधब्या ला एकूण बारा छोटे छोटे धबधबे येऊन मिळतात. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.
Other Details
मार्लेश्वरला जाण्यासाठी साखरपा, देवरुख तसेच रत्नागिरीहून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आहेत. तसेच पार्किंग ची ही उत्तम सोय आहे.
विमान :
मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
रेल्वे :
जवळचे रेल्वे स्थानक संगमेश्वर आणि रत्नागिरी आहे.
बस :
मार्लेश्वर हे देवरुख पासून १८ किमी तर संगमेश्वर पासून ३० किमी अंतरावर आहे. प्रथम मारळ गावात जावे लागते ते देवरुख पासून १४ किमी अंतरावर आहे.