Contact Us :
काशिद समुद्रकिनारा रायगड , अलिबाग - मुरुड रस्ता | Kashi Beach , Murud Road
मुरूडच्या उत्तरेस जवळपास १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
काशिदच्या किनार्यावरील सुरूंच्या नयनमनोहरी बागांतून विश्रांतीस थांबलेल्या पर्यटकांची गर्दी पाहूनच या स्थानाचे महत्व लक्षात येते. विकएंडला शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी जमतात. मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांचे शूटींग येथे सातत्याने होत असते.
समुद्रकिनारी छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.
क्रियाकलाप करू घेणे :
(पावसाळा वगळता) उपलब्ध पाणी खेळात सुविधा