Contact Us :
भोगवे समुद्रकिनारा, वेंगुर्ले | भोगवे बीच | Bhogave Beach, Vengurala
वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील समुद्रकिनाराही विलोभनीय आहे. भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो, हे आगळे वेगळे वैशिष्टय आहे. लांबच्या लांब पसरलेली पांढर्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनार्यावरील माड पोफळीच्या बागा यांमुळे या समुद्रकिनार्यावरील निसर्गसौंदर्य अधिक देखणे बनले आहे. कोचरे गावाच्या हद्दीत भोगवे समुद्र किनार्यालगतच्या एका टेकडीवर रम्य समुद्रकिनार्यावरच ऐतिहासिक निवती किल्ला हा छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलला छोटासा किल्ला आहे. निवती किल्ल्यावरुन भोगवेची मनमोहक, रम्य चौपाटी अप्रतिम दिसते. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. डॉल्फिनचे नृत्य प
हाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ' डॉल्फिन' चे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. यांत्रिकी पर्यटक होड्यांच्या जवळूनच त्यांचा जलविहार चालू असतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहाणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे.