Contact Us :
तारकर्ली समुद्रकिनारा - मालवण सिंधुदुर्ग | तारकर्ली बीच | Tarkarli Beach , Malvan
मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. तीरावरील नारळी पोफळीची हीरवीगार नयनरम्या दौलत , सुर्यास्त् आणि सूर्योदय या दोन्हींचे अनोखे दिव्या सौंदर्य न्याीहाळण्यारसाठी अप्रतिम स्थ ळ म्हरणजेच तारकर्ली बाधा व्हावी असे सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी
रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांतावतो. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. तंबूत निवास, नावेतून सफर व स्कूबा डायव्हिंगचा अनुभवदेखील येथे घेता येतो. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय.
क्रियाकलाप करू घेणे :स्कुबा डायविंग : आपण अरबी समुद्रात पाणी खाली कोकण अन्वेषण करू इच्छिता? कार्यक्रम सर्व वयोगटासाठी पुरवलेले आहेत : ओपन वॉटर , प्रगत पाणी , बचाव पाणबुडया , दिवे मास्टर , प्रमाणित डायविंग खेळाची , स्कुबा डायविंग , Snorkelling - इतर
Other Details
विमान :
चिपी विमानतळ मालवण, सिंधुदुर्ग
जवळचे विमानतळ दाबोलीम गोवा आहे.
रेल्वे :
जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ , 45 k.m. आहे
बस :
मुंबई तारकर्ली, 546 किमी, कोल्हापूर-तारकर्ली, 160 किमी, मालवण-तारकर्ली, 8 कि.मी. मालवण मुंबई , कोल्हापूर पुणे किंवा कडून आणि मालवण पासून तारकरली राज्य परिवहन मंडळाच्या बसेस .
रिक्षा मालवण पासून देखील उपलब्ध आहेत .