Contact Us :
कोर्लई किल्ला रायगड ,पेठ्वाडी | Korlai killa
कोर्लई किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कोर्लई गावातून जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव आहे. शेजारीच कोळीवाडा आहे. कोळीवाडयातूनच आपल्याला किल्ल्याकडे जावे लागते. किल्ल्याचा डोंगर एखादया भूशिरासारखा पाण्यात घुसलेला आहे. तीन बाजूला पाणी आणि दक्षिण बाजूला जमिनीशी सांधलेला हा किल्ला सन १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकार्याने बांधल्याचे म्हटले जाते.
मुख्य किल्ला पूर्व*पश्चिम जवळपास शंभर फुट तर दक्षिणोत्तर जवळपास एक हजार फुट विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशारावर लढल्याशिवाय आत प्रवेश नाही (None Passes me but fights) असा इशारा दगडावर कोरलेला आहे.
किल्ल्यास सात दरवाजे आहेत. किल्ल्यात गोडया पाण्याची वि
िर मोडकळीस आलेला चर्च तसेच एक मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्रास खेटून एक जुने दीपगृह आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सन १७४० च्या आसपास तो मराठयांच्या ताब्यात आला. परंतु १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच इंग्रजांच्या ताब्यात गेला.
इथल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावा आपण फक्त १० मी. रुंद अशी जागेवर फिरतो. हा बालेकिल्ला. इथून दर्शन होते ते एका विहंगम दृश्याचे. एका बाजूला निळ्याशार सागरावर छोट्या-छोट्या होड्या दिसतात, तर एकीकडे आपण खाडी आणि सागर यांची भेट झालेली पाहतो. इथे एक उत्तराभिमुख चर्चचे अवशेष आहेत. आता आपण उत्तरेकडे वळतो. सर्वप्रथम आपल्याला दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आत जावे लागते. पैकी समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सां दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सां फ्रांसिस्कु. इथे काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठा आहे. पश्चिम आण उत्तर तटबंदीला तोफा स्थानापन्न केल्या होत्या. इथे ७० तोफा आणि ८००० शिबंदी असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. आता जरा उत्तरेला वळलो की आपण इथल्या माचीवर पोहोचतो. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रुज म्हणतात. ही अंदाजे तीन मी. लांब माची आहे. थोडक्यात हा पोर्तुगीज धाटणीचा किल्ला आपल्याला सहजच त्याच्या सौंदर्यात रममाण होण्यास भाग पडतो.
Other Details
सर्वप्रथम आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाई सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. अथव मुरुड-जंजिऱ्याला जाणारी बस आपल्याल गावाच्या वेशीवर सोडते. गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो. एक आहे. समुद्रकिनाऱ्यावरून . इथून पायऱ्या चढून आपण ४० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो.
विमान:
रेल्वे :
बस: