Khubladha fort , Thal Alibaug - खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) रायगड , थळ

उंदेरी या जलदुर्गावर करडी नजर ठेवून असलेला किल्ला थळ गावाच्या समुद्रकिनार्‍यावर होता. हा किल्ला म्हणजे थळचा किल्ला किंवा खुबलढा किल्ला होय. खांदेरी किल्ल्याच्या उभारणीच्यावेळी व उभारणी नंतरही या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

इतिहास :

थळच्या किनार्‍यावर असणार्‍या नैसर्गिक उंचवट्यावर खुबलढा किल्ला उभा होता. इ.स १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधण्यास सुरुवात केल्यावर या किल्ल्याला महत्व आले. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजूरांना रसद, बांधकामाची इतर सामुग्री पुरवण्याची जबाबदारी थळच्या किल्ल्यावर होती. तसेच इंग्रज व सिद्दी यांच्यापासून नवीन तयार होणार्‍या किल्ल्याचे जमिनीकडील

ाजूकडून संरक्षण करण्याची जबाबदारी थळ किल्ल्यावर होती. इ.स १७४९ मध्ये सिद्दीने हा किल्ला जिंकला. पुढे १७५० मध्ये मानाजी आंग्रे याने हा किल्ला परत जिंकून घेतला. या युध्दात सिद्दीची २०० माणसे मारली गेली. पुढे - पुढे मराठ्यांना थळच्या किल्ल्याचे रक्षण करणे जिकरीचे झाले. त्यामुळे त्यांनी किल्ला मोडून त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या.

राहण्यासाठी खोल्या :

The fort was built on a natural elevation on the Thal coast. In 1659, when Shivaji Maharaj started building Khanderi fort, Khubladha played a major role as offshore base for men and material. Also, this was to protect any invasion on the land from British and Siddis. In 1749, Siddi conquered the fort. However, Manaji Angre got it back in 1750 in a battle where 200 people of Siddi were killed. Later, since the fort became more vulnerable to attacks, it was abandoned and the base was moved to Colaba fort of Alibaug.