Contact Us :
Songiri fort , ZAPADI Karjat - सोनगिरी किल्ला रायगड ,कर्जत
महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे अनेक किल्ले आहेत. एक रायगड जिल्ह्यात नागोठाणे जवळचा सोनगिरी तर दुसरा धुळ्या जवळचा सोनगिरी आणि पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी. गडकिल्ल्यांचा अभ्यास करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे स्थान. गडकिल्ले साधारणत: घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात. पुणे जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुध्दा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असे ही म्हणतात.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी नाही.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
गडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्य
वर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात.
Songiri fort Songiri fort Songiri fort Songiri fort Songiri fort Songiri fort
There are 2 forts by name Songiri in Maharashtra, one near Karjat in Pune district (also known as the fort of “Avalas”) and the other near Nagothane in Raigad district. Songiri in Raigad district was one of the supportive forts like Birwadi and Surgad to protect main forts like Avchitgad, Ghosalgad and Talgad.
Songiri is a small fort, and there are 2 dried up water tanks on the top, with remnants of ramparts and mansions. This was used as a watch tower.
Food , Drinking Facility is not available.
Getting Activities to do :
Accommodation :
Accommodation facility is not available.
Other Details
विमान :
मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
रेल्वे :
पळसदरी मार्गे :- पळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा. जामरूंग मार्गे :- कर्जत - खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते.
बस :
======================================================================
By Air :
Mumbai is a nearest airport.
By Rail :
Kasu station is a nearest railway station.
By Road :
We have to reach Kasu station after Pen on Konkan railway. From Kasu rickshaw is available to Pabal Phata. From here, we have to reach in Kondhvi village at 9km. One way to the fort goes from this village.
There is another village by name Zapadi at 3 km from Kondhvi. The way from here is less tiring. We reach a plateau in 45 min. The way to the fort is along a huge tree here. We can see 4 hillocks from here. The second from the left is Songiri. It takes 20 min from here to reach the top.