Contact Us :
पालगड किल्ला खेड दापोली
पालगड हे दापोली तालुक्यातील (रत्नागिरी जिल्हा) एक छोटेसे टुमदार गाव आहे. गावाजवळ पालगड किल्ला आहे.
साने गुरुजी ह्यांचा जन्म पालगड येथे झाला. त्यांच्या श्यामची आई ह्या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळ्तो. आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. लवकरच गावात साने गुरुजी स्मारक बांधण्यात येईल.
पालगड गावातील गणपती मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. इ.स. १९९६ साली गणपती मंदिराचा शतसांवत्सरिक महोत्सव साजरा करण्यात आला. पालगड महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने दापोली, खेड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.
Other Details
बई->माणगाव->आंबेत->मंडणगड->पालगड
विमानाने : मुंबई सर्वात जवळचे विमानतळ आहे.
रेल्वेने: खेड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
रस्त्याने : पालगड गावातून : पालगड गाव दापोली-खेड रस्त्यावर दापोलीपासून २१ किमी अंतरावर आहे. पालगड माची पर्यंत रस्ता आहे. हनुमान मंदिराजवळची वाट माथ्यावर जाते आणि येथून साधारण अर्धा तास लागतो. पालगड गावातून एक तास लागतो.
कदमवाडी गावातून
खेड-जामगे रस्त्यावरील कदमवाडी गावात यावे लागते