Contact Us :
सुमारगड किल्ला, खेड रत्नागिरी
सुमारगड हा नावाप्रमाणेच "सुमार" आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत
: करावी.
पाण्याची सोय : पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
Other Details
कसे जावे :
सुमारगडावर जाण्यासाठी महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घरे लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो, तो पार करून समोरचा डोंगर चढावा, पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहोचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते. पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासांचे आहे.
विमान:
रेल्वे :
बस: