Contact Us :
बारवाई किल्ला रत्नागिरी , पेढांबे - Barvai Fort RATNAGIRI , PEDHAMBE
चिपळूणच्या जवळ असलेला हा दूर्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळ्या असलेल्या डोंगरावर वसला होता. पेढांबे येथे सापडलेल्या ‘दसपटीचा इतिहास’ या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्याचे स्थान व रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
किल्ल्यावर कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्याच्या पठारावर देवराइत भैरी देवीची मुर्ती आहे. पठारावर पश्चिमबाजूच्या टेकडीवर एक वीरगळ उघड्यावर जमिनीत पुरलेली आहे. स्थानिक लोक त्याला ‘वेताळ’ म्हणून ओळखतात. त्याच्या थोडे पूढे जावून खाली उतरल्यावर एक छोटी गुहा आहे, पण आता ती बुजलेली आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील टे
डीवर चढल्यावर दगडात कोरलेले खोदलेले ४ फूट X ४ फूटचे तीन चर दिसतात. यांचा पुढील भाग निमुळता होत जाऊन तो कड्याच्या टोकापर्यंत जातो. या चरांचे नक्की प्रयोजन समजत नाही. कदाचित गडवरून टेहळणी/मारा करतांना या चरांचा ऊपयोग आडोसा म्हणून होत असावा. याच टेकडीवर घरांच्या जोत्याचे अवशेष दिसतात गडावर कुठेही पाण्याची सोय नाही.
===============================================================
Barvai Fort Barvai Fort Barvai Fort Barvai Fort
Barvai is built on a mountain which stands separate from the linked ranges of Sahyadri, near Chiplun. Its references are found in a book named “Daspaticha Itihaas”, which was found in Pedhambe village. This fort is said to have been used as a watch tower.
Other Details
कसे जावे :
पेढांबे करण्यासाठी फेरफार चिपळूण-कराड रोड वर चिपळूण पासून 10 किमी वर स्थित आहे. पेढांबे धनगरवाडी (अंबाडीवाडी) किल्ल्याच्या येथे स्थित आहे. येथून आम्ही 10 मिनिटांत किल्ला उंचीवर पोहोचू शकता. Dhangarwadi करण्यासाठी पोहोचण्याचा 2 मार्ग आहेत.
Getting There :
By Air :
Mumbai is nearest airport.
By Rail :
Chiplun is nearest railway station.
By Road :
The diversion to Pedhambe is located at 10 km from Chiplun on Chiplun-Karad road. Pedhambe Dhangarwadi (Ambadiwadi) is located at the base of the fort. From here, we can reach the top of the fort in 10 minutes. There are 2 routes to Dhangarwadi