Contact Us :
Somjai Devi Temple, Shrivardhan - सोमजाई देवी मंदिर , श्रीवर्धन
सोमजाई देवी मंदिर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गावातले देऊळ आहे.
महाराष्ट्रातील नावाजलेले तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून श्रीवर्धन शहर प्रसिद्ध आहे.पुराण व उपनिषदात श्रीवर्धन चा उल्लेख आढळतो .अगस्ती ऋषींचे वास्तव्य श्रीवर्धन मध्ये होते असा दाखला पौराणिक कथात आहे.
श्री सोमजाई देवस्थानाची स्थापना श्री अगस्ती महामुनीने केली असून देवस्थानाच्या चतु :सीमेस चार शिवशक्ती आहेत .त्यांची नावे कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी, चामुंडायनी अशी असून मुख्य देवता मंदिरात श्री सोमजाई या नावाने प्रसिद्ध आहे .श्री सोमजाई शाळीग्राम रुपात असून शिव , भवानी,नंदी व वासुकी या चार शक्ती एकत्र आहेत . सोमजाई मंदिर चा परिसर जवळ पा
38 गुंठे आहे .मंदिराची रचना व स्थापत्य कला पांडवकालीन असल्याचे निदर्शनास येते .साधारणतः 35ते 40 फुट उंचीवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर चे मुख्य छत कौलारू आहे .मंदिर बांधणीत जुन्या काळातील सागवान लाकडाचा वापर सर्वत्र करण्यात आल्याचे दिसून येते आहे .सोमजाई मातेच्या समोरच श्रीराम भक्त मारुती ची मूर्ती स्थानापन्न केली आहे .तसेच मंदिराच्या प्रांगणात साईबाबाची मुर्ती ,तुळशीवृंदावन व श्री गणेश यांची स्थापना केली आहे .वर्ष भर येणाऱ्या भाविक व देणगी दार दात्यांच्या दानांतून मंदिर जीर्णोद्धाराचे काम यशस्वी झाले आहे. नवरात्र उत्सवाची अनेक वर्षाची परंपरा सोमजाई मंदिरात जोपासली जात आहे. तालुक्यातील असंख्य भाविक सोमजाई चरणी मनोभावे नतमस्तक होतात .आज ही साप चावल्यालेल्या व्यक्तीस सोमजाई च्या चरणी आणल्यास तो व्यवस्थित होतो अशी आख्यायिका आहे . भाविकांच्या अनंत इच्छा पुर्ण करणारी देवी म्हणून सोमजाई ओळखली जाते.
श्रीवर्धन शहरात पुर्वी प्लेगची साथ प्रतिवर्षी येत असे तेव्हा कसबा मजकूर गावसयने श्री सोमजाई ला मनोभावे प्रार्थना करून शालिवाहन शके 1799 मध्ये रथ उत्सवाला प्रारंभ केला होता .सोमजाई श्रीवर्धन ची ग्रामदेवता असल्यामुळे श्रीवर्धन मधील सर्व समाज बांधव हिरीरीने नवरात्र उत्सवात सहभाग घेतात .
श्री सोमजाई चे नंदादीप चालविणारे चार खुम कसबा भंडारी समाज, नवीपेठभंडारी समाज, वाणी समाज, सोनार समाज असे आहेत . सोमजाई मातेच्या चरणी श्रद्धाळू आपले दुःख व व्यथा आज ही पुजाऱ्याच्या माध्यमातून व्यक्त करतात .देवीला सांगितलेले व्यथा सुटतात असे सर्व श्रीवर्धनकर मानतात त्यामुळे सोमजाईस नवसाला पावणारी देवता म्हटले जाते .
This Mandir is situated at the centre of Shriwardhan city, Raigad. The temple is located in an open ground along the main road. It is built on a rise and steps lead up to it. There is a modern concrete structure in front of the old tiled sanctum, built in a typical Konkani fashion.The Goddess Somjai combines in herself the four deities–Shiva, Bhavani, Vasuki and Nandi.
Somjai Devi Mandir is known for its miraculous healing power. It is believed that person with snake bite can be cured when taken to Somjai Devi Mandir.