Contact Us :
सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर श्रीवर्धन | Suvarna Ganesh Mandir - Diveagar shrivardhan
निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।</p>
<p>रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असु
५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .
Other Details
पुण्यापासून प्रसिद्ध असलेले दिवेगर साधारण १७० किलोमीटर अंतरावर आहे. दिवेगरला जाण्यासाठी ताम्हिणी घाटातून ४-५ तास लागतील. विशेषतः पावसाळ्यात आणि नंतर हा मार्ग आश्चर्यकारकपणे सुंदर आहे. मुंबईहून दिवेगरला जाण्यासाठी NH17 ने माणगावपर्यंत जावे लागते.
हवाई मार्गे:
सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आहे, जे दिवेगर दिवेगर पासून सुमारे 188 किमी अंतरावर आहे.
रेल्वेने:
माणगाव रेल्वे स्टेशन दिवेगर जवळ आहे आणि अंतर 57 किमी आहे.
रस्त्याने :
मुंबई ते दिवेगर १९३ किमी.