Contact Us :
जय गणेश मंदिर मालवण - jay Ganesh Mandir ,Sindhudurg, Malvan
जय गणेश मंदिर मालवण शहरापासुन अर्धा किमी अंतरावर असलेलं "जयगणेश मंदिर" हे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव "जय गणेश" असे ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभार्यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दि
णारा हा सुवर्णगणेश सिद्धी-बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल,तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद, लेखणी असून गणेशाचे पारंपारीक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे.मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. मकर संक्रांतीच्यावेळी सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळाळून निघतो यावेळी विशेष गर्दी असते.
Other Details
मालवण शहरापासून अगदी जवळ.
विमानाने :
चिपी विमानतळ, मालवण
रेल्वेने :
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ/कणकवली येथे आहे.
रस्त्याने :
मालवणला रस्त्याने सहज जाता येते. रस्त्याने, मालवण हे मुंबईपासून ५१४ किमी, रत्नागिरीपासून २०० किमी अंतरावर आहे. मुंबई किंवा गोव्याहून येताना, कसालपर्यंत राष्ट्रीय महामार्ग NH-17 घ्या आणि त्यानंतर मालवणला जाण्यासाठी अंदाजे 35 किमी प्रवासासाठी राज्य परिवहन बस किंवा रिक्षा घ्या.