मुरुड समुद्रकिनारा , अलिबाग | मुरुड बीच | Murud Beach -janjira

हिरवीगार वनराई, अथांग निळाशार अरबी समुद्र, रुपेरी-चंदेरी-वाळू-नारळी पोफळीच्या बागांना लागून मुरुडचा किनारा खुपच लक्षवेधी आहे. नवाबाच्य राजवाड्यापुढे वळणावर रात्रीच्यावेळी प्रवेश करतांना समुद्रकिनारी हायमास्ट दिव्यांची सोनेरी रोषणाई व तिन डोंगराच्या कवेतील मुरुड म्हणजे नैसर्गीक शांतीचा रात्रीच्या काळोखातही सुंदर भासतो.

सकाळच्या कोवळ्य किरणांमध्ये चकाकणारी वाळू निळेशार पाणी सुमारे अडीच कि.मी. लांबीचा हा किनारा पर्यटकांना मोहून टाकतो, समुद्रस्नानासाठी इतका उत्तम व सुरक्षीत किनारा शोधून सापडणार नाही. गोव्यापर्यंत पाहील्यास असे नैसर्गिक सौंदर्य चुकून एखाद्या सागरतटास मिळालेले दिसेल. म्हणून हा किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

गावाप्रम

णे समुद्रकिनारा स्वच्छ असलेला दिसतो. किनार्‍यावरील सुरुची बने, उजव्या हाताकडील प्रेक्षणीय राजवाडा, नवाबकालीन टुमदार इमारती यामुळे सगळे वातावरण आल्हाददायक भासत राहते.

सोनेरी वाळू, चिंबोर्‍यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या, लाटांबरोबर वाहून येणारे शंख-शिंपले यासाठी पर्यटकांनी नेहमी हा किनारा गजबजलेला असतो, मुरुड समुद्रकिनारी सुर्यास्त अनुभवण्यास हजारो पर्यटक सुट्टीत या किनारी ठाण मांडून असतात.