जंजिरा किल्ला रायगड, राजपुरी | Janjira Fort RAIGAD , MURUD

रायगड जिल्हातील मुरूड तालूक्यातील हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराजांपासून कोणत्याही राजाला हा किल्ला जिंकता आलेला नाही. कोकण किनारयाला लागूनच अलिबागपासून अंदाजे 45 किलोमीटरवर हा किल्ला आहे.

किनारयापासून दोन किलोमीटरवर समुद्रात जंजिरा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीच्या सहाय्याने जावे लागते. त्याची तटबंदी अजूनही भक्कम आहे. किल्ल्याला 14 बुरूज आहेत. प्रत्येक बुरूजावर मोठी तोफ आहे.

आतमध्ये बरीच पडझड झाली आहे. गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. पीर पंचायत सुरूलखानाचा वाडा पाहण्यासारखा आहे.मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावरील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. किनार्‍यावर सर्वत्र नारळाची झाडे पसरलेली आहेत.

/>
मुरूड लहान असले तरी येथील नबाबाचा वाडा पाहण्यासारखा आहे. तो मोडकळीस आला असला तरी त्याची भव्यता कायम आहे. जंजिरा किल्ल्याच्या जवळच पाच किलोमीटरवर पद्मदुर्ग आहे. तो शिवरायांनी बांधला.

सिंध्दुदुर्ग जिंकता यावा म्हणून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. हा किल्लाही पाहण्यासारखा आहे. एकंदरीत मुरूड जंजिरा व पद्मदुर्ग हे वीकएंड आनंदी घालवण्याचे चांगले ठिकाण आहे.