Contact Us :
लिंगाणा किल्ला रायगड ,महाड | Lingana Fort , Mahad
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे कातळ २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे.
रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह होते. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी यासाठी अतिशय अनुकूल आहेत. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय होता. गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद होत असत.
पाण्याची सोय
पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरड्या वाटेवर थोडे पुढे पाण्य
चे एक टाके आहे.
राहण्यासाठी खोल्या :
गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
लिंगाण्या वरील गुहा प्रशस्त असून ३० ते ४० माणसे राहू शकतात. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की, आपण एका कोरड्या हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायर्या आहेत, ज्या वरती असलेल्या गुहांपर्यंत जातात. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका आहे. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णत: घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३ ते ४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे, मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आगळाच आनंद मिळतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.
Other Details
कसे जावे :
या गडावर जाण्यास प्रथम आपणास महाडला यावे लागते. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता गाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचतो. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर पुढे घसरड्या वाटेवरून आपण अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो.
विमान:
रेल्वे :
बस: